मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे २०२० हे वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खराबच गेले. पण आगामी २०२१ तरी बॉलिवूडसाठी चांगले जाईल असे म्हणायला हरकत नाही. या नवीन वर्षात शाहरुख खानचे तब्बल ७ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
१. पठाण : यशराज बॅनरचा चित्रपट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सिद्धार्थ आनंद. याच वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. शाहरुख खानसोबतच यात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
२. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी हा चित्रपट सामाजिक – कॉमेडी जॉनरचा असेल. पंजाब येथून कॅनडाला जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रवासादरम्यान आलेले अनुभव यात दिसतील.
३. साउथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्यासोबतही शाहरुख एक चित्रपट करणार आहे. यात किंग खानचा डबल रोल असण्याची शक्यता आहे. यातील एक भूमिका पोलिसांची तर एक गुन्हेगाराची असू शकते. कारण जौहर या चित्रपटाची निर्मिती करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.
४. राजा निदिमोरु आणि कृष्ण डीके या दिग्दर्शक जोडीसोबतही शाहरुख खान काम करणार आहे. हा एक कॉमेडी ऍक्शन थ्रिलर चित्रपट असेल. सध्या हे दोघे आपल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शाहरुख खान याचीच असेल.
याशिवाय ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकेट्री – द नाम्बी इफेक्ट’ आणि ‘लाल सिंह चढ्ढा’ हे चित्रपट देखील पुढच्या वर्षात येणार आहेत. यातील ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुख शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसेल. तर लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात स्वतः आमीर खानने अनेक प्रसंगांचे चित्रीकरण केल्याचे समजते.