नवी दिल्ली – नवीन वर्ष सुरू व्हायला आता अगदी काही तास राहिले आहेत. यंदाची एकूण परिस्थिती पाहता नववर्ष स्वागतासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता कमीच आहे. पण सेलिब्रेशन तो बनता है. त्यामुळे यावर तोडगा काढत गुगलने एका व्हर्च्युअल इव्हेंटचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम युट्यूबवर होणार असून ‘हॅलो २०२१’ असे नाव त्याला देण्यात आले आहे. ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. यात अभिनेता टायगर श्रॉफ, रैपर बादशाह, जोनिता गांधी, कॉमेडीअन झाकीर खान आदी सहभागी होणार आहेत. या इव्हेंटचा पार्टी पॉपर आयकॉन गुगलने लाँच केला असून, त्यावर या कार्यक्रमाशी संबंधित सगळी माहिती मिळेल.
हा इव्हेंट कसा पाहू शकाल?
गुगलने नवीन वर्ष स्वागताचा एक माहोलच केला आहे. गुगल सर्च बारवर जर तुम्ही ‘new year’s eve’ असे सर्च केलेत तर अनेक रंगीबेरंगी कागद साईटवर दिसतील. सर्च बारच्या खाली या इव्हेंटची लिंक दिली आहे. याशिवाय तुम्ही युट्यूबवर जाऊनही हा इव्हेंट सर्च करू शकता. कामाच्या धबडग्यात तुम्ही हा कार्यक्रम विसराल अशी भीती वाटते का? तर त्याचीही सोय गुगलने केली आहे. तुम्ही याचा रिमाईंडर सेट करू शकता.
बघा हा ट्रेलर