नवी दिल्ली – काही वर्षापूर्वी भारताला अन्य देशांकडून शस्त्रास्त्र खरेदी करावी लागत होती, आता ते देशच भारताकडून शस्त्रे खरेदी करत आहेत. ही बाब एकाएकी घडलेली नाही. गेल्या काही वर्षातील भारताच्या ठोस प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार भारतातील शस्त्रे कारखाने इस्त्राईल, स्वीडन, संयुक्त अरब अमिराती (युएई), ब्राझील, बांगलादेश, बल्गेरिया इत्यादी देशांना शस्त्रे विकत आहेत. यात युएईने सर्वाधिक खरेदी केली आहे. याशिवाय फ्रान्स आणि अमेरिकेसह युरोपमधील काही देशांना शस्त्रे विकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
ज्या देशांकडून शस्त्रे विकत घेतली जायची तेच देश आज शस्त्रे खरेदी करत आहेत. या देशांना शस्त्रे विक्रीचा करार ऑर्डनन्स फॅक्टरीजसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. या देशांमध्ये सर्वाधिक १५५ मिमी तोफांची विक्री केली गेली असून डीआरडीओने विकसित केली आहे. उलट यापूर्वी इस्राईल, स्वीडन, युएईसह अनेक देशांचे शस्त्रे खरेदी करणारा भारत हा एक प्रमुख देश होता.










