नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकारच्या कोरोना विषाणूच्या भीतीमुळे जगातील ४० हून अधिक देशांनी ब्रिटनपासून स्वत: ला वेगळे ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भारतासह युरोपमधील देशांनी ब्रिटनला जाण्यासाठी व तेथून जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली असून आपल्या सीमांना सील केले आहे.
कोरोना विषाणूच्या या नवीन प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हा विषाणू जगात कधी आला? आणि किती धोकादायक आहे? यासह विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..
प्रश्न : नवीन विषाणू केव्हा आला?
उत्तर : दि. २० ते २१ सप्टेंबर दरम्यान लंडनच्या केंट भागातून घेतलेल्या नमुन्यात तीन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूचे नवीन स्वरूप ( प्रकार ) समोर आले होते. कोरोना विषाणूचे कित्येक प्रकार उद्भवले आहेत, त्यातील तिघेही महत्त्वपूर्ण आहेत आणि तिन्हीही ओळखले गेले आहेत.
प्रश्न : नवीन प्रकार कसा ओळखला गेला?
उत्तर : सामान्य आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये व्हायरसचे नवीन रूप ओळखले गेले. टेकपथची चाचणी किट यूकेमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. या किटची तपासणी केल्याने सहसा कोरोनाची तीन जीन दिसून येतात, परंतु अलिकडच्या काळात अशी प्रकरणे वाढू लागली आहेत, ज्यामध्ये केवळ दोन जनुके उघडकीस आली आहेत. दरम्यान, या प्रकरामध्ये अचानक तेजी (वाढ ) दिसून आली. त्यानंतर असे निश्चित झाले की, हे नवीन व्हायरसमुळे होते. भारतानेही या चाचणी किटच्या वापरास मान्यता दिली आहे.
प्रश्न : व्हायरस का बदलतो?
उत्तर: कोणत्याही विषाणूच्या अनुवांशिक घटकांमध्ये कालांतराने आंशिक बदल होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशाप्रकारे, विषाणू मानवी पेशी अधिक सहजतेने प्रवेश करण्याचे मार्ग शोधतात. वुहानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यापासून कोविड -१९ विषाणूमध्ये आत्तापर्यंत किमान 25 वेळा परिवर्तन झाले आहे.
प्रश्न : नवीन विषाणू अधिक प्राणघातक आहे?
उत्तर : बर्मिंघम युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मॅकनाली म्हणाले की, हा एक नवीन प्रकारचे विषाणू आहे. मात्र आम्हाला त्याबद्दल अद्याप जैविकदृष्ट्या काहीच माहित नाही. त्याच्या प्रभावाविषयी अंदाज बांधणे खूप कठीण आहे. तथापि, ब्रिटनने अधिकृतपणे व्हायरस 70 टक्के वेगवान असल्याचे जाहीर केले आहे.
प्रश्न: केरळमध्ये या विषाणूची उदाहरणे सापडली आहेत का?
उत्तर : केरळच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, सप्टेंबरपासून हा विषाणू ब्रिटनमध्ये सक्रिय आहे आणि या काळात हजारो विदेशी प्रवासी या केरळमध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे नवीन व्हायरसचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. आता आरोग्य मंत्रालयाच्या किंवा आयसीएमआरच्या सूचनेनुसार येथे सर्व नमुन्यांचा संपूर्ण अभ्यास केला जाईल तेव्हाच त्याविषयी योग्य माहिती मिळेल.
प्रश्न : ब्रिटन व्यतिरिक्त तो कुठे पसरत आहे?
उत्तर : इटली आणि फ्रान्सने ब्रिटन नंतर कोरोना विषाणूशी संबंधित संसर्गाला दुजोरा केली आहे. याव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेत व्हायरस संसर्गाच्या दुसर्या लाटेचे कारण असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर अमेरिकन अधिकाऱ्यानीही अशी शंका व्यक्त केली आहे की, देशात नवीन विषाणूमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
प्रश्न : हा विषाणू अनियंत्रित झाला आहे?
उत्तर: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे इमर्जन्सी चीफ मायकेल रायन म्हणतात की, ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूचे नवीन रूप अनियंत्रित नाही. यापूर्वी सर्व देशात अन्य साथीचा रोगाच्या काळात आणखी भयानक परिस्थिती पाहिली गेली आहे, मात्र ब्रिटनमधील परिस्थिती अनियंत्रित नाही तरीही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे.