मुंबई – ब्रिटनमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या रुपाचा धसका शेअर मार्केटनेही घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबई शेअर मार्केटच्या निर्देशांक तब्बल २ हजार अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीमध्येही ४०० अंकांची घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे काढून घेतल्याने शेअर बाजारात घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्याचा परिणाम बाजारावर होत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी धसका घेतल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ६४, ९६० अंकांवर बंद झाला होता. आज सकाळी तो सुरू झाला. तेव्हा २८ अंकांची घसरण झाली. दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि सेन्सेक्स ४४, ९२३ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी गेल्या आठवड्यात १३, ७६० अंकांवर बंद झाला होता. तो आज १३, १३१ अंकांवर बंद झाला आहे.