नंदुरबार – शेतजमीनीच्या सातबारा उता-यातील नावात दुरुस्ती करण्यासाठी १५०० रुपयाची लाच घेतांना नंदुरबार जिल्हयातील डोगेगाव येथील तलाठी जयसिंग गुंजा-या पावरा यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे नवापूर तहसिलदार यांनी नावात दुरुस्ती करण्याचे आदेशीत केले होते. तरी ही लाच मागण्यात आली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर साफळा रचून ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे या तलाठीस १२ मार्च २०१८ मध्ये सुध्दा लाच घेतांना पकडण्यात आले होेते. पण, त्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी लाच घेण्याचा प्रकार केला व तो साफळ्यात अडकला.