प्रति कोंबडी ९० रुपये तर प्रति अंडे ३ रुपये भरपाई देणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री अॅड. के.सी. पाडवी यांनी दिली.
लॉकडाउनच्या काळात नाशिक, पालघर जिल्ह्यात झालेल्या कुमारी मातांच्या प्रकारांची माहिती घेऊन, नेमकं कशामुळे हे प्रकार घडलेत, याची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेबद्दलही आपले मत मांडले. ते म्हणाले की, राज्यपालांनी सरकारच्या बाजूने बोलायला हवे त्यांनी राज्यपालांनी राजकीय बोलणे चुकीचे आहे. शपथविधीवेळी जे झाले ते सर्वांनी बघितले. त्यांना विचारसरणी म्हणून काही बोलावं लागत असेल तर नाईलाज होऊ शकतो. राज्यपाल राज्यघटनेचे संरक्षक, त्यांनी राज्यघटनेला अपेक्षित काम करण्याची गरज असल्याचेही पाडवी यांनी सांगितले. राज्यपाल असो वा अन्य कुणी ज्याने त्याने आपली मर्यादा कायद्याप्रमाणे राखली पाहिजे असेही ते म्हणाले.