नाशिक – बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या नरेडको नाशिक व क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. शुक्रवारी (४ डिसेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयात हा छोटेखानी समारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिवाळीच्या अनुषंगाने कुठलीही भेटवस्तू न स्वीकारता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दुर्बल घटकांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या या स्तुत्य उपक्रमास पाठिंबा म्हणून नरेडको नाशिक व क्रेडाई नाशिक मेट्रो यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे व क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष रवी महाजन, सचिव गौरव ठक्कर आणि महानगरपालिका कार्यकारी अभियंता आर. व्ही. आहेर, शहर अभियंता संजय घुगे आदी प्रयत्नशील आहेत.