नाशिक- ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे लिखित ‘सुखमय वास्तू’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. वास्तूशास्त्राविषयी सर्व माहिती यात देण्यात आलेली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भुजबळ फार्म येथे प्रकाशन सोहळा पार पडला. नरेंद्र धारणे यांच्या पुस्तकात ज्योतिषशास्त्राप्रमाणे वस्तूची रुपरेषा कशी असावी याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, माजी खासदार समीर भुजबळ, अशोक सावंत, सार्थक धारणे आदी मान्यवर उपस्थित होते .