दिंडोरी : विधानसभा हगांमी अध्यक्षपदी विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांचे नियुक्तीचे दिंडोरी पेठ मतदारसंघात स्वागत करण्यात आले आहे .त्यांचे नियुक्ती बद्दल मुंबई येथे जिल्हा बँकचे संचालक गणपतराव पाटिल यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते राजेंद्र उफाडे,नरेंद्र पेलमहाले,अविनाश जाधव , कृष्णा मातेरे आदी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिल्यामुळे अध्यक्षपदाचे पद रिक्त झाले. त्यामुळे झिरवाळ यांना हंगामी अध्यक्षपद मिळाले. हे पद झिरवाळ यांना दुस-यांदा मिळाले आहे हे विशेष..








