सुकमा (छत्तीसगड) – बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमकी दरम्यान अपहरण झालेल्या कोब्रा दलाचे कमांडो राकेश्वरसिंग मनहास यांची गुरुवारी सुटका करण्यात जवानांना यश मिळाले आले. कमांडो राकेश सिंह यांनी नक्षलवाद्यांसोबत ते सहा दिवस कसे भयानक होते, याचा उलगडा केला आहे.
३ एप्रिल रोजी टेकलगुडा-जोनागुडा गावाजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत २२ सैनिक ठार आणि ३० हून अधिक जखमी झाले होते. यावेळी मनहास यांना नक्षलवाद्यांनी त्याला शरण जाण्यास सांगितले. अखेर आत्मसमर्पणानंतर त्यांना कोठे नेले गेले, त्यांना याची माहिती नाही, कारण येथून नेताना त्यांचे डोळे बांधले होते. मनहास सहा दिवस नक्षलवाद्यांच्या कैदेत होते. त्यानंतर कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी या सहा दिवसांची कथा सांगितली.
राकेश्वरसिंग मनहास म्हणाले की, ३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या वेळी मला नक्षलवाद्यांनी घेरले होते. नक्षलवादी स्थानिक भाषेत बोलत होते. त्यामुळे त्याला त्यांची भाषा समजू शकली नाही. ते सहा दिवस अत्यंत भितीदायक होते, काही वेळा अन्नपाण्याविना दिवस काढावे लागले.
नक्षलवाद्यांनी मनहासला अटक केल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात केंद्राकडे लवादाची नेमणूक करण्याची मागणी केली. बस्तरचे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते धरमपाल सैनी आणि गोंडवाना समाजप्रमुख मुरैया तरेम हे काही स्थानिक लोकांसह जंगलात गेले होते. चर्चा झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी काही मागण्या केल्या आणि अखेर जवानांना सोडले.
राकेश्वरसिंग मनहासला दुचाकीवरून तार्राम कॅम्पमध्ये आणले गेले. चकमकीच्या सहाव्या दिवशी नक्षलवाद्यांनी धरमपाल सैनी यांच्याकडे अखेर या जवानाला पाठविले. त्यावेळी येथे लोकांनी प्रचंड गर्दी केली. कमांडो राकेश सिंह यांच्या सुटकेसाठी सैनी यांनी खूप सहकार्य केले, विशेष म्हणजे ९१ वर्षीय धरमपाल सैनी बस्तरचे सुप्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आहेत. आचार्य विनोबा भावे यांचे शिष्य असून ते १९७९ पासून बस्तर येथे स्त्री शिक्षणासाठी कार्यरत आहेत. गेल्या चार दशकांत त्यांनी ३६ आश्रमशाळा उघडल्या. १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले.
https://twitter.com/neeraj_rajput/status/1380158024782905352