बिजापूर (छत्तीसगड) – जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये मोठी चकमक झाली. यात पहिली गोळी चालवली गेली. तेव्हाच साऱ्यांना आश्चर्य वाटले. कारण जवान कधीच गावांवर गोळी चालवत नाहीत. तेवढ्यात डोंगरावरून जोरदार फायरिंग सुरू झाले. जवानांना काही समजण्यापूर्वीच नक्षलवादी त्यांच्यावर हावी झाले होते. त्यामुळेच जवानांना मोठे नुकसान भोगावे लागले.
केवळ जवानांनाच नाही तर नक्षलवाद्यांनाही मोठे नुकसान या चकमकीत भोगावे लागले. कमीत कमी १२ नक्षलवादी यात मारले गेले आणि तेवढेच गंभीर जखमीही आहेत. नक्षलवादी आपले नुकसान सहसा दाखवत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती कळू शकत नाही. मात्र आपल्या साथीदाऱ्यांचा मृतदेह उचलण्यासाठी नक्षलवादी ट्रॅक्टर घेऊन आल्याचे स्थानिकांनी आणि जवानांनी बघितले होते.
बस्तरचे आयजी सुंदरराजन पी यांनी म्हटले आहे की, पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) बटालियन दहशतवाद निर्माण करण्याच्या मागे लागले आहेत. आणि जवान तेच रोखण्याच्या मागे लागले आहेत. कठीण भौगोलिक परिस्थिती व नक्षलवाद्यांचा भाग असूनही जवान आपल्या जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांच्या भागात घुसून त्यांना आव्हान देत आहेत.









