शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नक्षत्रांची हसरी लिपी घेऊन येते दिवाळी

नोव्हेंबर 13, 2020 | 6:51 am
in इतर
0
diwali

राजू देसले, नाशिक

—

नक्षत्रांची हसरी लिपी घेऊन दिवाळी आनंदाचा कारंजा घेऊन चिंब भिजवत असते. खरं तर हा नात्यांचा उत्सव. जीवापाड जपलेल्या सार्‍यांनाच भेटीचा हा भाग्ययोग. जीवन ही सुंदर आणि तितकीच आश्वासक गोष्ट आहे. हे जाणवून देणारी व जागवणारी दिवाळी चार चाँद लावून जाते आणि प्रेमाची उधळण करून जाते.
दिवाळीशी नातं तस बालपणापासूनच शाळेत असतांना दिवाळीसाठी मामाच्या गावाला जाण्याचा मधाळ आनंद काही औरच असायचा. शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात एक कविता होती. त्यातून अलगद कळत गेले की उजेडाशी आपलं नातं किती आदिम आहे.
आधी होते मी दिवटी
शेतकर्‍यांची आवडती
झाले इवली मग पणती
घराघरातून मिण मिणती…
प्रकाशाशी नातं सांगणारी ही दिवटी प्रत्येकाच्या मनामनात उजेड पेरत जाते आणि त्यासाठी निमित्त असतं दिवाळी सणाचं. आपुलकीची जिव्हाळ्याची ओल घेऊन येणारा हा सण. प्रेमाचा हुंकारच व्यक्त करतो.
पवित्रता, मांगल्याची जोपासना करत, निरांजनाला प्रकाशस्वर प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतो.

IMG 20201002 WA0026 e1601795170588
लाविते मी निरांजन
तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेऊनिया आली
आज धनत्रयोदशी
आली दिवाळी-दिवाळी
(बाळ कोल्हटकर)
‘सप्तरंगाची उधळण करणारी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन येते’ आणि नव्या उत्कर्षाच्या क्षणांना चांदण्यांचे घुंगरू बांधून जाते. रोजच्या जीवनव्यवहारातल्या कटु अनुभवांना विसरायला भाग पाडते आणि आतला सकारात्मकतेचा सूर आळवण्यास शब्द ताल देते.
‘नक्षत्रांचा साज लेऊनी’
रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या
ही तर दीपावली.
(मधुसुदन कालेलकर)
बहीण-भावाच्या नात्याची वीण उसवणारी आणि नातं दृढ करणारी दिवाळी भाऊबीजेच्या रूपाने लोकगीतातून समोर येते.
‘दिवाळीच्या दिवशी माझ्या तारामध्ये मिरे
असे ओवाळीले मायबाई तुझे हिरे’
मायेच्या या हिर्‍यांना प्रेमाचं कोंदण असतं आणि आभाळभर मायेची बोटं इडा-पीडा टळो असा सहज आशिर्वाद देऊन जातात. या नात्यात निरपेक्षपण गलबलून येणार्‍या आठवणींचा झोका असतो. बहिण सासुरवाशिण झालेली असते. तिला भावाच्या आठवांची हुरहुर लागून राहते आणि ताटातील निरांजनातील ज्योतीचा प्रकाश तिचंही आयुष्य उजळून टाकणारा असतो.
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
(शांताराम आठवले)
लखलखणार्‍या चंद्राचं वरदान लाभलेली ही विलक्षण आणि असंख्य ज्योतीचा प्रकाश घेऊन येणारी दिवाळी आकाशाचं नयन विभोर अंगण उजळते आणि ती प्रकाश किरणे मनांवर गोंदून जाते.
हिंदीत दिवाळीतून प्रकाशमान जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारी गीते आहेत. त्यातून माणसांमाणसांतील भेदभाव विसरून एकोप्याने राहण्याचा संदेश दिला आहे.
भूल कर बात पुरानी बैठिए मिल समीप
रात अंधियारी बडी लेकर दीया हाथ
खूब मनाओ दिवाली मिल कर सबके साथ
भेदभाव सब भूल के पूजो सब त्योहार
(गोविंद भारद्वाज)
लहान मुलांमध्येही या सणाचा उत्साह वेगळाच असतो. फटाके, फराळ, धमाल करणे ही त्यांची हा उत्सव साजरा करण्याची व्याख्या.
दिवाळी आली दिवाळी आली
सुट्टी पडली सुट्टी पडली
आली आली फटाक्याची गाडी
आली आली फराळाची गाडी
(दिलीप खापरे)
माणसाच्या मनाच्या पटलावर अविवेकाचा काळाकुट्ट अंधार तयार झाला आहे तो दूर करण्यासाठी विवेकाचा नंदादीप मी ठेवतो तो म्हणजे दिवाळीचाआनंद असे संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीतून सांगतात.
मी अविवेकाची काजळी
फेडोनी विवेक दीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी
निरंतर
(संत ज्ञानेश्वर)
संत जनाबाईंनी साक्षात परमेश्वराला दिवाळीचे निमंत्रण दिले आहे आणि त्यातून ईश्वर भक्तीचे प्रेम व्यक्त केले आहे.
आनंदाची दिवाळी
घरी बोलवा वनमाळी
घालीते मी रांगोळी
गोविंद गोविंद
(संत जनाबाई)
संत साहित्यातून लोकसाहित्यातून जात्यावरच्या ओव्यातून माय-माऊलींनी दिवाळी सणाची महती कथन केली आणि आणि अजूनही हा झरा वाहतच आहे.
गगन सदन तेजोमय
तिमिर हरून करूणाकर
दे प्रकाश, दे अभय
छाया तव, माया तव हेच
परम पुण्यधाम
(वसंत बापट)
दु:खाचा अंधाराचा नाश करून उजेडाचं मागणं मागणारी ही प्रार्थना तेजोमय विश्वाची आळवणी करते.
समाजमनाच्या उत्सवी जगण्याचं प्रतिबिंब कला-साहित्यातून अनेक वर्ष उमटत आहे आणि त्यातून ही परंपरा जोपासण्याचं कार्यच होत आहे.
आजचं कार्पोरेट जग आणि गतिमान जीवनशैलीत नात्यांना जपण्याची आणि जोपासण्याची ही सण-उत्सवाची संजीवनी जगण्यावरचा विश्वास बळकट करत जाते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वागत दिवाळी अंकांचे – थिंक पॉझिटिव्ह – राग का येतो?

Next Post

अखेर लडाखमधील त्या चौक्या उध्वस्त होणार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post

अखेर लडाखमधील त्या चौक्या उध्वस्त होणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011