नाशिक – येथील प्रसिद्ध कॅलिग्राफर नंदू गवांदे यांच्या देवनागरी लिपीतील कॅलिग्राफीची दखल रोमानिया येथील फेस्टीव्हलमध्ये घेण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार गेले आहे.
रोमानियाच्या युनायटेड बाय कॅलिग्राफी या प्रदर्शनात त्यांच्या दोन देवनागरी कॅलिग्राफीची प्रशंसा केली असून ऑनलाईन प्रदर्शनात हे पेंटिंग पाहता येत आहे. या प्रदर्शनात ३८ देशातले ३८ कॕलिग्राफर सहभागी झाले असून त्यात भारतातून एकमेव नाशिकच्या नंदू गवांदेंची निवड झाली. संपूर्ण जगभरात हे प्रदर्शन ऑनलाईन सुरु आहे. महाराष्ट्रातील अक्षरलेखनाची कला सर्वदूर पसरली असून जगभरातून त्यांच्या देवनागरी कॅलिग्राफीचे कौतुक होत आहे.
सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष प्रदर्शन आयोजित करणे शक्य नाही. मात्र, रोमानियातल्या भारतीय दूतावास यांनी कामाची दखल घेत आॕफिशीयल फेसबुक पेजवर संबंधित पेटिंग्स शेअर केले आहेत. ‘युनायटेड बाय कॕलिग्राफी २०२०’ येथे ऑनलाईन प्रदर्शन सुरु आहे.
येथे पहा प्रदर्शन…
https://artspaces.kunstmatrix.