नंदुरबार – राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून गुरूवारपासून शिवशाही आसनी नंदुरबार-पुणे बस सुरू करण्यात आली आहे. प्रवाशाच्या मागणीनुसार आता दररोज शिवशाही आसनी बस ही पुणेपर्यत धावणार असल्याची माहिती धुळे विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली. शिवशाही आसनी नंदुरबार-पुणे नाशिक मार्गे दररोज सकाळी ८.३० वाजता आणि पुन्हा रात्री ९ वाजता या प्रमाणे सेवा उपलब्ध होणार आहे. नियमीत लालपरी नियमीत नंदुरबार-पुणे बससेवा नाशिक आणि शिर्डी मार्गे सुरूच आहे. यात प्रवाशांच्या सोयीकरीता दररोज, नंदुरबार-पुणे, बससेवा उपलब्ध आहे. यामुळे प्रवाशांची देखील सोय होणार आहे, असे नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.