बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नंदुरबारला कोरोनावरील इंजक्शन उपलब्ध करुन द्या

by India Darpan
जुलै 28, 2020 | 9:05 am
in राज्य
0
ESKXHE UUAAanKe

पालकमंत्र्यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तिंवर तातडीने उपचार करण्यासाठी  रेमडीसीव्हर, फलॅवीपीरॅवीर आणि टोसीली झुमॅब या इंजेक्शनचा मुबलक साठा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच इतर नागरीकांनी  काही दिवसापूर्वी कोरोनावर उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनचा पुरेसा साठा जिल्ह्यात आवश्यक असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर २१ जुलै रोजी पालकमंत्री पाडवी यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी केली.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तिंची संख्या वाढते आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भाग दुर्गम व अतिदुर्गम आहे. अशा परिस्थितीत बाधित व्यक्तीला संकटाच्यावेळी उपचार करण्यासाठी इंजेक्शन आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पालकमंत्री स्वत: सातत्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत असून कोरोना संसर्ग रोखण्याविषयी अधिकाऱ्यांशी संवाद देखील साधत आहेत. शासन स्तरावरील सर्व मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्वॅब तपासणी लॅब जिल्ह्यात सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे व ऑक्सिजन सुविधा असणाऱ्या बेड्सची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, हात साबणाने स्वच्छ धुणे आणि शारिरीक अंतर या बाबी अत्यंत महत्वाच्या असून नागरिकांनी सवयीचा भाग म्हणून याकडे लक्ष द्यावे. कोरोना आजाराच्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील ॲड.पाडवी यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सराफ बाजार पोलीस चौकीचे उदघाटन

Next Post

१ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस

Next Post
प्रातिनिधीक फोटो

१ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011