राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशांचे पालन
नंदुरबार : राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १२६३ पाणी साठ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून ८६ कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत.
नवे जलस्त्रोत विकसीत करण्यात व त्याद्वारे पाणीसाठा करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता अस्तित्वात असलेल्या पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन करून पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय हरीत लवादाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात पुनरुज्जीवन झालेल्या कामांची माहिती संकलीत करण्यात आली व काही नवी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे १०३२ कामे करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे २२१ कामे करण्यात आली असून ७७ काम प्रस्तावित करण्यात आली आहेत. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे ६ कामे करण्यात आली असून ९ नवीन कामे प्रस्तावित करण्यात आली आहे, तर मृद व जलसंधारण विभागातर्फे ४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात किमान पाणीसाठा पुनरुज्जीवनाचे एक काम करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. पुनरुज्जीवन कामामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ ग्रामीण जनतेला होणार आहे.