नागपूर – येथील ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारला आहे.
समाजाकडून आपल्याला भरपूर मिळालं आहे. त्यामुळे चार वर्षापूर्वीच आपण पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व संस्थांचा आदर राखून तसंच त्यांचे आभार मानून, ही माझी भूमिका मांडत असल्याचं खरे यांनी सांगितलं आहे.