मुंबई – सेलिब्रिटी थर्टी फर्स्टला काय करतात, यावर चाहत्यांचे मोठे लक्ष असते. विशेषतः महेंद्रसिंग धोनीसारखी ‘कूल पर्स्नालिटी’ काय करणार आहे हे तर जाणून घ्यायचेच असते. यंदा महेंद्र सिंग धोनीचा थर्टी फर्स्ट दुबईत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आता मोकळा झाला असून पार्टीच्या मूडमध्ये असल्याचे छायाचित्रांवरून दिसत आहे. आयपीएलही संपल्यामुळे तसेही कुठल्याच क्रिकेटचे टेंशन त्याला नाही. दोन दिवसांपूर्वी धोनीची बायको साक्षी हिने इन्स्टाग्रामवर एक सुरेख फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत कॅप्टन कूल दुबाईच्या आर्ट्स क्लबमध्ये आपल्या मित्रांसोबत वेळ घालविताना दिसत आहे.
यापूर्वी दुबईमध्ये यजुर्वेंद्र चहल आणि त्याची बायको धनश्री यांनी धोनी व साक्षीची भेट घेतली होती. चहलचे अलीकडेच लग्न झाले आहे. या नव्या जोडप्याने धोनीच्या कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवला. चहलने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेर करून आनंदी असल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. आयपीएल संपताच महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासोबत दुबईत पर्यटनासाठी गेला आहे. तर चहल आणि त्याची पत्नी हनीमूनसाठी दुबईत आहेत.