लंडन – कोरोनाचा नवा विषाणू जगात एक गंभीर आव्हान निर्माण करीत आहेत. त्यामुळे याचा सर्वात मोठा धोका ब्रिटिश नागरिकांना असून जगभरात या विषाणूच्या प्रसार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ब्रिटनमध्ये या नव्या प्रकारचा कोरोना आढळला होता. आता हा नवा कोरोना जगातील ८० हून अधिक देशांपर्यंत पोहोचला आहे
ब्रिटनमधील साथीचे रोग व कोविड -१९ जेनोमिक्सचे संचालक शेरॉन पीकॉक म्हणाले की, कोरोनाचा हा नवीन प्रकार देशभर पसरला असून आता जग व्यापून टाकत आहे. कोरोनाचा हा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे ही चिंतेची बाब आहे. तसेच तो दक्षिण आफ्रिकेही वेगाने पसरत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात त्याची पहिली दोन प्रकरणे आढळली आहेत.
अॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीने म्हटले आहे की, कोरोनाच्या नवीन प्रकाराविरूद्ध प्रभावी लस तयार करण्यास सहा ते नऊ महिने लागू शकतात. नवीन लस तयार करण्याचे काम सुरू असून ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कंपनीने एक लस विकसित केली आहे. या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या आखाती देशाने भारतासह २० देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे.