धुळे – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत (काकासाहेब) काशिनाथ केले यांचे अल्पशा आजाराने रविवारी (१८ ऑक्टोबर) रात्री पुणे येथे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे. ते लाडशाखीय वाणी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. नामांकीत दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनही ते ख्यात होते. धुळे शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी १ वाजता बिलाडी रोड येथील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा मधुबन कॉलनी, वाडीभोकर रोड येथून निघणार आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक क्षेत्रातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.