नाशिक – नाशिक इंडस्ट्रिजच अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) वर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या या वादाला आता पूर्णविराम मिळणार आहे. सह धर्मादाय आयुक्त जयसिंग झपाटे यांनी ही नियुक्त केली आहे. आता निमाचा कारभार असिस्टंट चॅरीटी कमिशनर राम लिपटे, चॅरिटी निरीक्षक पंडीतराव झाडे व अॅड. देवेंद्र शिरोडे (धुळे) हे बघणार आहे.
निमाच्या निवडणुकीवरुन हा वाद थेट न्यायालय व त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयात पोहचला होता. त्यानंतर अगोदर दिलेल्या निकालातच प्रशासक बसवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता ही नियुक्ती झाली असून त्यामुळे निमाच्या संघर्ष करणा-या दोन्ही गटांना हा धक्का बसला आहे.