मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर गुरुवारी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मुंडे यांच्यावर असलेले आरोप गंभीर असून पक्षप्रमुख म्हणून त्यावर तातडीने निर्णय घेऊ. आज धनजंय मुंडे यांनी त्यांची या आरोपाबाबत त्यांची भूमिका माझ्यासमोर मांडली. आता मी पक्षाच्या सहका-यांबरोबर याबाबत चर्चा करेल. त्यानंतर त्यावर सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.
मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सुरू झालेला वाद लक्षात घेत मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीली. त्यात त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला त्यानंतर भाजपने मुंडे यांना खिंडीत गाठण्यासाठी आक्रमक धोरण स्विकारले. या प्रकरणी भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.