सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महिला मोर्चा तर्फे सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन

by India Darpan
जानेवारी 15, 2021 | 11:41 am
in राज्य
0
bjp

मुंबई – सामाजिक न्याय या सारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

उमाताई खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सामाजिक न्याय या सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे,  याचा विचार करावाच लागणार आहे. मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार  दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता  व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.

एकीकडे स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती सारखा कायदा आपण करतो. मात्र दुसरीकडे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील असेही खापरे यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना मिळणार  २६ जानेवारीपर्यंत अधिकृत वीज जोडणी

Next Post

सह्याद्री संवाद उपक्रमांतर्गत साखर उद्योगाचे भवितव्य’ विषयावर डॉ. भोसले यांचे रविवारी व्याख्यान

India Darpan

Next Post
Dr Bhosale

सह्याद्री संवाद उपक्रमांतर्गत साखर उद्योगाचे भवितव्य’ विषयावर डॉ. भोसले यांचे रविवारी व्याख्यान

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011