मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाची तक्रार देणाऱ्या रेणू शर्मा यांनी अखेर आज दुपारी ट्विट करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे.
या महिलेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण सर्वांनीच एक निर्णय घ्या, आपण सर्वजण आणि जे मला ओळखतात त्यांनीही माझ्यावर वाईट आरोप करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ठरवून टाका. तुमच्या इच्छेनुसार मी माघार घेण्याचा निर्णय घेत असल्याचे तिने ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या ट्विटमुळे आता हा सर्व वाद संपुष्टात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
https://twitter.com/renusharma018/status/1349808007215923200
रेणू शर्मा ही महिला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप होत आहे. मुंडे यांच्याह अन्य नेत्यांनीही तसा आरोप केला आहे. त्यामुळे उद्विग्न होऊन शर्मा यांनी ट्विट केल्याचेही बोलले जात आहे.