मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनीच आता मुंडे यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. करुणा यांची बहिण रेणू यांनी काही दिवसांपूर्वी मुंडे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर बराच गदारोळ झाला. अखेर रेणू शर्मा यांनी ती तक्रार मागे घेतली. आणि आता खुद्द करुणा यांनीच तक्रार केल्याने मुंडे आणखी अडचणीत सापडले आहेत.
करुणा शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची व्यथा मांडली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून आपल्या २ मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप करुणा यांनी केला आहे. विशेष म्हणजे, दोन मुलांमध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. म्हणजेच, राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी अल्पवयीन मुलाला डांबून टेवल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहकार्य करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा करुणा यांनी दिला आहे. राजकीय बळाचा दुरुपयोग मुंडे करीत असल्याचा आरोपही करुणा यांनी केला आहे.
मुंडेंनी केला हा खुलासा
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या आरोपांवर खुलासा केला आहे. करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या वादाबाबत मी स्वतःहून उच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मेडिएटर म्हणून दोन बैठका झाल्या आहेत. १३ फेब्रुवारी रोजी पुढील बैठक आहे. या बैठकीत मुलांसह इतर वाद व मुद्द्यांबाबत चर्चा चर्चा व निर्णय होणार आहे. जे मुद्दे न्यायालयात आहेत त्याबाबत अशी जाहिर वाच्यता करणे आणि मागणी करणे योग्य नाही. हे केवळ माझ्या बदनामीसाठी सुरू असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच, याबाबत आपण न्यायालयापुढे बाजू मांडू असेही मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.