मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. करुणा शर्मा नावाच्या महिलेशी असलेल्या संबंधातून दोन मुले झाल्याचा खुलासा खुद्द मुंडेंनीच केला आहे. त्यामुळे दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरुन त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. याप्रकरणी भाजपने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याची बाब लपविल्याने आता त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सुरू झालेला वाद लक्षात घेत मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीली. त्यात त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला आहे. याच पोस्टचा आधार घेत भाजपने आता मुंडे यांना खिंडीत गाठण्यासाठी आक्रमक धोरण स्विकारले आहे.
काय सांगितले मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये?
https://www.facebook.com/DPMunde/posts/2903576766538601?__tn__=K-R