न्यूयॉर्क – केनिया, आफ्रिकेमध्ये नवजात बाळांना आईच्या हातातून पळवून या बालकांची ३० ते ५० हजारांना विक्री केली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर खुलासा बीबीसीच्या आफ्रिका आय डॉक्यूमेंट्रीमध्ये करण्यात आला आहे. या घृणास्पद तस्करीचे दु: खद स्वरुप म्हणजे रस्त्यावर राहणाऱ्या गरीब, अशिक्षित स्त्रियांची मुले देखील पळवली जात आहेत. यामुळे बहुतेक गुन्हे नोंदवले जात नाहीत. जे लोक नोंदणी करतात त्यांना मुले परत येण्याची शाश्वती नाही. केनियाच्या मिसिंग चाइल्ड या स्वयंसेवी संस्थेच्या मारियाना मुनयेंडो म्हणाल्या की, तिन ते चारवर्षांत बाल चोरीच्या सुमारे ६०० घटना समोर आल्या आहेत. संस्थेकडे नोंद झालेल्या आकड्यांपेक्षा वास्तविक आकडा जास्त असल्याचे त्या म्हणाल्या.
अशा प्रकारे मुले गायब होतात
बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या महिलांना हेरून त्याची मुले पळवली जातात. तपासादरम्यान आफ्रिकेची एक महिला काही तासांपूर्वी संपर्कात आली होती. पाच महिन्यांच्या मुलीला आईकडून पळवून नेण्यासाठी ३२ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी शहानिशा केली. मात्र अद्याप तपास लागू शकला नाही. तसेच छोट्या दवाखान्यांपासून ते मोठ्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मुलांची तस्करी केली जात आहे.