लखनऊ – हाथरस मधील सामुहिक बलात्कार प्रकरणी चारही आरोपींनी पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम्ही निर्दोष असून पीडितेला आई आणि भावानेच मारहाण केल्याचा दावा या पत्रात आरोपींनी केला आहे. या पत्रावर संदीप, रामू, रवी आणि लवकुश या चार आरोपींच्या स्वाक्षर्या तसेच अंगठ्याचे ठसे असल्याचे जेलर आलोक सिंह यांनी म्हटले आहे.
मृत महिलेबरोबर कोणतेही दुष्कृत्य केले नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. मुलीशी फोनवर बोलत असतांना भावाने तिला मारहाण केल्याचे धक्कादायक वक्तव्य आरोपींनी केले आहे. याप्रकरणात आम्ही निर्दोष असल्याचा दावा आरोपींनी केला आहे. मृत मुलीच्या भावावर गंभीर आरोप करत या चौघांनी हे पत्र पोलिसांना पाठवले आहे. हाथरस प्रकरणात आरोपींनी स्वत: ला खोट्या प्रकरणात अडकविण्यासाठी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात युक्तिवाद केला आहे.
आरोपी संदीप, रामू, लवकुश आणि रवी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्य आरोपी संदीपने पत्रात घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. मुख्य आरोपीने पत्रात दावा केला आहे की, मृत महिलेशी त्याची मैत्री होती, त्यावर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला भेटायला बोलावले होते, मात्र मुलीच्या भावाची आणि आईच्या सांगण्यावरून दोघेही घरी परतले होते. मृत महिलेचा भाऊ आणि तिच्या आईने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पत्रात केला आहे. याप्रकरणी चारही आरोपींनी पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.