नवी दिल्ली – जम्मू-काश्मिरमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानचा आणखी एक कुटील डाव उधळून लावला आहे. कठुआ जिल्ह्यात पाकिस्तानलगगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठा भूमीगत बोगदा बीएसएफने शोधून काढला आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक बोगदा सापडला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या बोगद्यांमधून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट असल्याचे दुसून येत आहे.
बीएसएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर भूमीगत बोगदा तयार केला होता. हा बोगदा आम्हाला सापडला आहे. हा गुप्त बोगदा हिरानगर सेक्टरमधील पानसर भागात आहे. सीमा चौकीवर कारवाई दरम्यान तो शोधण्यात आला. गेल्या १० दिवसांपूर्वीच असा एक बोगदा सापडला होता. तर, सांबा आणि कठुआ जिल्ह्यात गेल्या गेल्या सहा महिन्यातला हा चौथा बोगदा आहे. १५० मीटर लांब, ३० फूट खोल आणि ३ फूट व्यासाचा हा बोगदा आहे. गेल्या १० वर्षात या सीमेवर आतापर्यंत १० बोगदे शोधण्यात आले आहेत. याद्वारे पाकिस्तानचा कुटील डाव स्पष्ट होत आहे.
https://twitter.com/ANI/status/1352897962108538880