नवी दिल्ली – कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीबाबतचे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे (आयसीएमआर) एक पत्र व्हायरल झाले आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना लिहिलेले आहे.
या पत्रात मोठा खुलासा करण्यात आला आहे. पूर्वी आरटीपीसीआर चाचणीची २४ व्हॅल्यू ही संबंधित रुग्णाची चाचणी निगेटिव्ह असल्याचा मापदंड होता. मात्र, कोरोना विषाणूचे बदलेले स्वरुप पाहता आता ही व्हॅल्यू तब्बल ३५ झाली आहे. म्हणजेच, ज्यांच्या कोरोना चाचणीचा आरटीपीसीआरची व्हॅल्यू ३५ किंवा त्यापेक्षा अधिक आहे तेच आता कोरोना निगेटिव्ह आहेत. म्हणजेच, आतापर्यंत ज्यांची व्हॅल्यू २४ होती ते कोरोना बाधित होते आणि तेच कोरोना नसल्याचे सांगत इतरत्र फिरत होते. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात ही बाब महत्त्वाची ठरली आहे.
यापूर्वी आपल्याकडे असं म्हटलं जायचं की, RTPCR टेस्टची CT व्हॅल्यू २४ असेल तर तो कोविड पॉजिटिव्ह पण ‘ए सिम्पटमॅटिक’ (म्हणजे त्यांना कुठलेही लक्षण नाही असे म्हटले जायचे. मात्र, ICMR ने स्पष्ट केले आहे की, CT व्हॅल्यू ३५च्यावर असेल तरच अहवाल निगेटिव्ह धरला जाईल. या व्हायरल पत्रामुळे कोरोना संसर्गा बाबतचा मोठा खुलासा झाल्याचे सांगितले जात आहे.
हे व्हायरल पत्र असे