नाशिक – शहरातील नाशिकरोड भागात असलेल्या अरिंगळे मळे परिसरात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पाच संशयितांनी मिळून हा अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी एका महिलेसह एकूण ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (९ जानेवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिडित मुलीने आईला माहिती देताच आईने नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तातडीने संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक महिला, एक विधीसंघर्षित बालक आणि पाच युवक यांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.