नाशिक – शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे अर्ज स्विकारणाऱ्या आणि प्रमाणपत्र देणाऱ्या सेतू सुविधा केंद्राची सेवा द्वारका येथे सुरू करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जनतेला लागणारे सर्व प्रकारचे कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट पडतात. ऑनलाईन सुविधा असली तरी अनेकांना त्याची माहिती नाही किंवा त्यासाठीची सुविधा नाही. अशा वेळी त्यांना सायबर कॅफेत जावे लागते. सर्वसामान्य जनतेला एकाच ठिकाणी या सुविधा मिळाल्या तर निश्चितच त्यांना त्रास कमी होईल. या हेतूने एस बी एन्टरप्रायजेसने श्री साई नगर, जांदे साॅमिल जवळ, द्वारका येथे सेतू केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. एस बी एंटरप्रायझेस केंद्राच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पूर्व विभागीय अध्यक्ष आसिया शेख, स्थानिक महिला गिता खुने, छाया ठाकूर, अमिषा गुप्ता, मिना ठाकूर, जयश्री टोंग, शितल लचके, अंजना पाटील, प्रशांत अहिरे, ओमकार पाटील, यश मगर आदी उपस्थित होते.
या सुविधा मिळणार
या केंद्रात सेतू सुविधा, RTO सुविधा, शासकीय योजना, बँकींग सुविधा, PF सुविधा, इन्शुरन्स, उत्पन्नाचे दाखले, नाॅन क्रिमिलेअर, जातीचे दाखले, डोंगरी दाखले, पासपोर्ट साठी लागणारे कागदपत्रे, विवाह नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे, भाडे करार नामा कागदपत्रे, संजय गांधी व श्रावण बाळ पेन्शन योजना आयुष्य मान योजना, फूड शाॅप अॅक्ट लायसन्स या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सागर बेदरकर व महेश भामरे यांनी केले आहे.