नाशिक – शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर अमृतधाम येथे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या १५ मार्च २०२१ पासून २१ एप्रिल २०२१ पर्यंत द्वारका ते के के वाघ कॉलेज पर्यंतचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी राहणार बंद राहणार आहे. तसा निर्णय नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. २० जानेवारी २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या उड्डाणपुलावर एकेरी वाहतूक राहणार आहे. पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे असेल वाहतूक नियोजन