पिंपळगाव बसवंत: द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरातील अहेरगाव, पालखेड मिरची, पाचोरे वणी, बेहेड, नारायण टेंभी, परिसराला अवकाळी पावसाने तडाखा दिला. जोरदार झालेल्या गारांच्या तडाख्यात काढणीस आलेल्या द्राक्षबागांना फटका बसल्याने द्राक्ष उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्याने नागरिक गर्मीपासून हैराण झाले होते. मात्र शनिवार सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत दुपारी अवकाळी पावसाने विजेच्या जोरदार कडकडाट व गारांसह हजेरी लावल्याने काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. तर कुठे द्राक्ष उत्पादकांचे द्राक्ष खोके पावसाने खराब झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
………
अहेरगाव, पालखेडही झोडपले…..
निफाड तालुक्यातील अहेरगावत देखील अवकाळी पावसाने तडाखा दिला.जोरदार झालेल्या गारांच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
…….