साकोरे मिग येथील प्रकार
…
पिंपळगाव बसवंत: द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील आधीच कोरोना महामारीसह अवकाळी पावसापासून लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्ष बागा काही निवडक निर्यातदार कंपन्यांकडून नाकारल्या जात असल्याचा वास्तव व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
निफाड तालुक्यातील चास दिंडोरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांचा उच्चप्रतिच्या द्राक्षाची साकोरे मिग येथील एका निर्यातदार कंपनीने पाहणी केली. त्यानंतर तो माल निर्यात दार कंपनीला देण्याचे ठरले. निर्यातदार कंपनीच्या मागणीनुसार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेतून २०क्विंटल मालाची खुडणी करून द्राक्ष माल आपल्या एक्सपोर्ट कंपनीत आणल्यानंतर मालाची पाहणी करून निर्यातदार कंपनीने एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा माल नाकारल्याने यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने हताश होत सदर एक्सपोर्टरसचा व्हिडीओ सोशल माध्यमसनवर व्हायरल करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडल्याने निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
एकजुटीचे आवाहन…..
एक्सपोर्ट कंपनीने सोन्यासारखा द्राक्ष माल नाकारला, शिवाय मालाची जबाबदारी देखील घेण्यास कंपनी तयार नसल्याने सोशल माध्यमावर व्यथा मांडत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून तालुक्यातील शेतकऱ्यांनी अशा एक्सपोर्ट कंपनीच्या विरोधात एकजूट करत पाठीशी उभे राहण्याचे करण्याचे आवाहन व्हिडिओतून केले.