नाशिक – महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते. जवळपास ७५ टक्के द्राक्ष निर्यात हि भारताबाहेर नेदरलँड, रुस, बांगलादेश, जर्मनी, यु.के. यासह अशा अनेक देशांमध्ये द्राक्ष निर्यात केली जात आहे. आपल्या मार्फत निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्षांची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. फळांमध्ये सर्वात जास्त निर्यात द्राक्षांची केली जाते. असे बोलत असताना खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एमइआयएस या योजनेअंतर्गत ताजे फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीवर सबसिडी दिली जीएफओबीच्या मूल्यावर ५ ते ७ टक्के होती. ही योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागु होती. केंद्र सरकारने आर.ओडीटीईपी. नावाची एक नवीन योजना लागु केली आहे. परंतु योजनेअंतर्गत किती टक्के सबसिडी मिळणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे सांगत खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री यांना विनंती केली की, मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रतीचे द्राक्ष जे भारतातून निर्यात सुरु करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे रेल्वे द्वारे कृषी उत्पादनावर सबसिडी दिली जात आहे. त्याचप्रमाणे द्राक्ष व इतर फळे व भाजीपाल्यावर लवकरात लवकर ही सबसिडी देण्याची तरतूद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांचेकडून संसदेत करण्यात आली.