नाशिक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी बँकामध्ये असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग यांच्या एक कोटी पर्यंतच्या कर्जा वरील दोन टक्के व्याज परतावा योजना जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या वतीने सिडबीच्या माध्यमांतून बँकांना हा परतावा मिळणार आहे. अशा सवलतीसाठी भाजपा उद्योग आघाडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर व सहकार भारतीच्या राष्ट्रीय पदाधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. इतर मागण्यांसाठी अजूनही पाठपुरावा करुन उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल अशी आशा भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केली आहे.