नेपिता – एक फेब्रुवारीला म्यानमारमधील सत्ताबदलात निर्णायक भूमिका बजावणारे जनरल कमांडर इन चीफ मिन आग ह्लाईंग यांनी आंग सांग सत्तेला देशातून बेदखल करून टाकले. अर्थात त्यांनी २७ जानेवारीलाच त्याचे संकेत दिले होते. कोण आहेत जनरल मिन, आजवरचा त्यांचा प्रवास कसा आहे, आदी बाबी आपण आज जाणून घेणार आहोत…
जनरल मिन यांनी १९६२ आणि १९८८ च्या सत्ताबादलाचे उदाहरण गेल्या २७ जानेवारीला देत इशाराही दिला होता की, जर निवडून आलेले सरकार संविधानाचे पालन करणार नाही तर ते सरकार उलथवून लावायला हवे. त्यांच्या या विधानानंतर माध्यमांनी बरेच तर्क लावले होते आणि चारच दिवसांनी मिन यांनी म्यानमारचे आंग आंग सूच्या सरकारला सत्तेवरून बेदखल केले.
कोण आहे जनरल मिन
६५ वर्षांचे जनरल मिन यावर्षी जुलैमध्ये कमांडर इन चीफ या पदावरून निवृत्त होणार होते. म्यानमारमध्ये लष्करी राजवट आल्यामुळे आता असा अंदाज लावण्यात येत आहे की मिन दीर्घकाळ सरकारमध्ये कायम राहतील.
मिन यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सांगण्यात आले होते की परिषद निवडणुक घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी करेल आणि देशात नव्याने निवडणुका घेईल. मिन यांनी स्टेट काऊंसीलर आंग आंग सू आणि राष्ट्रपती विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करून देशात एक वर्षासाठी आणीबाणीची घोषणाही केली होती.
रोहिंग्यांच्या विरोधात आक्रमक
२०१६-२०१७ मध्ये जनरल मिन रखाईन प्रांतात रोहिंग्या समुदायाच्या विरोधात आक्रमक कारवाईसाठी ओळखले जातात. त्यावेळी ते जगभरात चर्चेत होते. सैन्याच्या या कारवाईमुळे रोहिंग्या मुस्लीमांना म्यानमार सोडून पळ काढावा लागला होता. या नरसंहारामुळे मिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टिका झाली होती.
अनेक बलाढ्य देशांचा विरोधही सपहन करावा लागला होता. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने म्हटले होते की म्यानमार सेनेते कमांडर इन चीफ मिल यांच्यासह म्यानमारचे अनेक आघाडीचे सैन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात युद्ध गुन्ह्यांसाठी चौकशी व्हायला हवी. फेसबुकने तर त्यांचे अकाऊंटही डिलीट केले होते. अमेरिकेने २०१९ मध्ये जनरल मिन यांच्यावर दोनवेळा मानवाधिकार उल्लंघनात त्यांच्या भूमिकेसाठी बंधने घातली होती.
सर्वांत शक्तीशाली व्यक्ती
सत्ताबदलानंतर मिन हे म्यानमारमधील सर्वांत शक्तीशाली व्यक्ती म्हणून पुढे आले आहे. ६५ वर्षीय मीन यांच्या आणीबाणीच्या घोषणेमुळे त्यांची देशावरील पकड अधिक मजबूत झाली आहे. मिन यांना येथवर पोहोचण्यासाठी मोठा प्रवास करावा लागला आहे.
सैन्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना दोनवेळा अपयश आले आणि तिसऱ्यांदा त्यांची नॅशनल डिफेन्स अॅकेडमीत निवड झाली. सैन्यात कमांडर इन चिफसोबतच राजकीय पातळीवरही ते खूप जास्त शक्तीशाली आहेत. म्यानमारमध्ये लोकशाही बहाल झाल्यानंतर मिन यांनी म्यानमारच्या सैन्यावर प्रभाव पडू दिला नाही. उलट लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकाही झाली.