नवी दिल्ली – कोणत्याही देशात तेथील राज्य कारभार योग्य रितीने चालवण्यास कायदा अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखली गेली नाही तर अराजक निर्माण होते. परंतु काही देशात समाजातील समस्या दूर करणारे कायदेच अडचणीचे ठरणार वाटतात. जगात असे अनेक देश आहेत ज्यांचे कायदे सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहेत. आता जगातील काही विचित्र नियमांबद्दल (कायदे) जाणून घेऊ या …
च्युइंगम खाण्यास बंदी:
दारू (अल्कोहोल), सिगारेट, तंबाखू, पान मसाला इत्यादी वस्तूंवर बंदी घातली असे ऐकले आहे. पण कधी च्युइंगम बंदी बाबत ऐकले आहे का? कारण सिंगापूरमध्ये २००४ पासून च्युइंगम खाण्यास बंदी आहे. या कायद्यामागील सरकारचा तर्क असा आहे की, च्युइंगमुळे स्वच्छता ठेवण्यात अडचण येत आहे. फक्त इतकेच नाही तर आपण या देशात बाहेरून च्युइंगम आणू शकत नाही. आपल्याकडे च्युइंगम असल्यास, ते विमानतळावर आपल्याकडून घेतले जाते.
जॉगिंग करण्यावर बंदी :
बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक देश असून आपण तेथे जॉगिंग करू शकत नाही. आरोग्यासाठी जॉगिंग करणे फायदेशीर ठरू शकते, परंतु या देशात २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी जॉगिंगवर बंदी घातली. या विचित्र कायद्याच्या मागे ते असा युक्तिवाद करण्यात येतो की, काही लोक असामाजिक उपक्रमांसाठी जॉगिंगसाठी वापर करतात.
संसदेत मृत्यू बेकायदा:
इंग्लंडमध्ये असा कायदा आहे की, इथल्या संसदेत कुणालाही मृत्यू येऊ शकत नाही किंवा येऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. २००७ मध्ये, याला यूकेचा सर्वात हास्यास्पद कायदा म्हटले गेले. त्यावेळी विरोध करताना काही लोक म्हणाले होते की, या कायद्याला काही आधार नाही. तथापि, असेही म्हटले जाते की, नेमके या कायद्याबद्दल कोणतेही लेखी स्पष्टीकरण नाही.
बालकाचे नाव ठेवण्याचा (नामकरण विधी ) पालकांना अधिकार नाही :
डेन्मार्कमध्ये पालक आपल्या मुलाचे नाव त्यांच्या इच्छेने देऊ शकत नाही. त्याबाबतचा निर्णय सरकार घेते, यासाठी बालकांच्या नावांची यादी सरकारकडून दिली जाईल, त्यापैकी तुम्हाला एक नाव निवडावे लागेल. या यादीमध्ये नसलेल्या पैकी वेगळे आपल्या निवडीचे नाव जर आपल्या बाळाचे ठेवायचे असेल तर त्याकरिता आपल्याला चर्च आणि सरकारकडून मान्यता घ्यावी लागते.