नवी दिल्ली – देशात १२ सप्टेंबरपासून नवीन ८० ट्रेन धावणार असून त्याचे आरक्षण हे १० सप्टेंबरपासून सुुरु केले जाणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी दिली. याअगोदर देशात २३० स्पेशल ट्रेन सुरु आहे. आता त्यात या नवीन ट्रेनची भर पडणार आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस सुरू होणार असून केवळ आरक्षण असलेल्यांनाच गाडीत प्रवेश मिळणार आहे.
पुढील सूचना मिळेपर्यंत १२ सप्टेंबरपासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
०२१०९ ही विशेष रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२ सप्टेंबरपासून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल.
०२११० ही विशेष रेल्वेगाडी मनमाड येथून १२ सप्टेंबरपासून दररोज ०६.०२ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला त्याच दिवशी १०.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव येथे थांबा असणार आहे. १७ द्वितीय आसन श्रेणी आणि ३ वातानुकूलित चेअर कार अशी या गाडीची रचना राहणार आहे. या विशेष रेल्वेगाड्या बुकिंगच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्या अशा