शुक्रवार, सप्टेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशात कोविड चाचण्यांचा विक्रम, एका दिवसात सुमारे नऊ लाख चाचण्या

by Gautam Sancheti
ऑगस्ट 19, 2020 | 1:11 am
in राष्ट्रीय
0
IMG 20200716 WA0021

– सर्वाधिक  ५७,५८४ रुग्ण बरे होण्याचा विक्रम
– बरे झालेल्या रुग्णांची संख्या  १३ लाखांनी अधिक

नवी दिल्ली – भारताने कोविड-१९ चाचण्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका दिवसात सुमारे ९ लाख  (८,९९,८६४) चाचण्या केल्या असून एका दिवसात केलेल्या आजवरच्या या सर्वात अधिक चाचण्या आहेत. यामुळे, आजपर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ३,०९,४१,२६४ इतकी झाली आहे.

चाचण्यांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर, ८.८१ टक्के इतका कमी राहिला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सरासरी दर ८.८४ टक्के इतका होता.

भारतात गेल्या चोवीस तासात, कोविडचे ५७ हजार ५८४ रुग्ण बरे झाले असून हा ही नवा विक्रम आहे. याच काळात, देशात ५५ हजार ७९ नवे रुग्ण आढळले आहेत. आता अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्याना उपचारानंतर सुट्टी दिली जात असल्याने, आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९ लाख ७७ हजार ७७९ वर  पोहोचली आहे. यामुळे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या यातील तफावत १३ लाख ४ हजार ६१३ च्या पुढे गेली आहे.

दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचा दर आता ७३.१८ टक्के इतका झाला आहे आणि कोविडचा मृत्यूदर १.९२  टक्यांपर्यंत कमी झाला आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या एकत्रित प्रयत्नामुळे तसेच केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीट धोरणामुळे ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये CFR चा दर राष्ट्रीय सरासरी दरांपेक्षा कमी आहे. आक्रमक चाचण्यांमुळे लवकरात लवकर रुग्ण शोधणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांना योग्य वेळी अलगीकरणात ठेवता आले. त्याशिवाय, गंभीर रूग्णांवर प्रभावी उपचार पद्धतीचा वापर केल्यामुळे,रुग्णांचा मृत्यूदर देखील कमी झाला आहे.

Image

सध्या देशात एकून सक्रीय रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजार १६६ इतकी असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत हा दर २४.९१ टक्के इतका आहे. देशात कोविडची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचेच या आकड्यांवरुन सिध्द झाले आहे.

देशभरात कोविडच्या चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशात, एकूण १४७६ प्रयोगशाळांमध्ये कोविडच्या चाचण्या होत आहेत. त्यापैकी ९७१ प्रयोगशाळा सरकारी तर ५०५ प्रयोगशाळा खाजगी आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोठी घोषणा; या राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ भूमिपुत्रांनाच स्थान

Next Post

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, गर्दी टाळा – मुख्यमंत्र्याचे आवाहन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Next Post
CM Uddhav Thackeray new

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, गर्दी टाळा - मुख्यमंत्र्याचे आवाहन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011