नवी दिल्ली – जगभरात अनेक देशात कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात रशिया सारख्या देशाने तर लस तयार करण्याचा दावा केला आहे. भारतात देखील कोरोना लसीची चाचणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. देशात कोरोना लस कुठल्या टप्प्यात आहे? नेमकी सध्यस्थिती काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या संदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात कोरोना लसीबाबत आश्वासन देण्यात आले आहे. या संबंधी माहीती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी कोरोनाची लस उपलब्ध होताच बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला मोफत लसीकरण मिळू शकेल. आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केलेले हे पहिले वचन आम्ही नमुद आहे.
लसीच्या संशोधन आणि विकासाबाबत माहिती देताना निर्मला सीतारमन म्हणाल्या की, देशात तीन लसी चाचण्या आता अंतिम टप्प्यात असून त्या उत्पादनाच्या मार्गावर आहेत. जर या क्षेत्राशी संबंधित लोक उत्पादनास परवानगी देत असतील तर आम्ही ते मोठ्या प्रमाणात तयार करण्यास तयार आहोत. तसेच अर्थमंत्री म्हणाल्या की, भारत इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करेल की आम्ही बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरणाचे आश्वासन लवकरच पूर्ण करू.