नवी दिल्ली – मोदी सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला असून यामुळे देशात वायफाय क्रांती होणार आहे. पंतप्रधान वाय फाय अॅक्सेस इंटरफेस या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.
या योजनेअंतर्गत देशात १ कोटी डेटा सेंटर उघडणार आहे. तशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेअंतर्गत सरकार पब्लिक डाटा सेंटर उघडणार आहे. विशेष म्हणजे यास कुठलेही परवाना, नोंदणी किंवा शुल्क लागणार नाही. या केंद्रांसाठी ७ दिवसातपरवानगी दिली जाणार आहे. सध्याच्या दुकानदारांना या केंद्रात रुपांतरीत होता येणार आहे.