कोल्हापूर – देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८५) यांचे दुःखद निधन झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू म्हणून त्यांची ओळख होती. तसेच, त्यांनी कुस्तीपटूंच्या अनेक पिढ्या घडविल्या. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी कुस्ती खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने देशाने एक महान कुस्तीपटू गमावला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
१९५९ ला दिल्लीत झालेल्या कुस्तीत त्यांनी त्यावेळचा दिग्गज पहेलवान रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंगला हरवून हिंदकेसरी झाले. खंचनाळे त्यांच्या जीवनात अनेक कुस्त्या जिंकल्या. वडिलांकडून आलेला कुस्तीचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत, राज्यातल्या अनेक पहेलवानांपर्यंत पोहचवला. राष्ट्रीय तालिम संघाचं अध्यक्ष म्हणूनही खंचनाळे यांनी काम केलं.