डॉ. प्रितेश जुनागडे यांनी केले ७ वर्षीय मुलीवर प्रत्यारोपण
नाशिक – देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रीया येथील डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या लोटस इन्स्टिट्यूट ऑफ हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि अस्थिमज्जा सेंटर येथे यशस्वीरित्या करण्यात आली. सेल प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेद्वारे गंभीर रक्त आजार असलेल्या ७ वर्षांच्या मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रात व नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या बाबत अधिक माहिती देताना डॉ. जुनागडे यांनी सांगितले की, संगमनेरमधील ७ वर्षाच्या मुलीला अप्लास्टिक ॲनिमिया होता, यामध्ये शरीरातील स्टेम सेल्स मधील बिघाडामुळे शरीरात लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स तयार होत नाहीत . यामुळे त्या रुग्णाला गेल्या २ वर्षांपासून वारंवार रक्त आणि प्लेटलेट रक्तसंक्रमण करण्यात येत होते. अशा गंभीर आजारावर उपचार म्हणजे दुसर्याचे “स्टेम सेल्स” देणे जेणेकरून ते रक्त पेशी तयार करू शकतील.व हे शक्य आहे जर रुग्णाला कोणी स्टेम पेशी देऊ शकेल असा “दाता” असेल. सामान्यत सख्खे भावंड (भाऊ व बहीण) स्टेम पेशी दान करू शकतात परंतु भावंडांच्या स्टेम पेशी जुळण्याची शक्यता फक्त २५ % असते.
लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या ७ वर्षीय रुग्णाची एक लहान बहीण होती, जीची स्टेम पेशी जन्माच्या वेळी साठवली गेली होती (कॉर्डच्या रूपात) ती १००% जुळली जाईल आणि भविष्यात त्या रूग्णासाठी वापरता येईल या आशेने . पण दुर्दैवाने ही स्टेम सेल फक्त ५० % जुळत होती, म्हणून त्यांचा वापर करू शकलो नाही असेही डॉ. जुनागडे यांनी नमूद केले.
स्टेम सेल बँक
आपल्या देशात ब्लड बँक सारख्याच कॉर्ड स्टेम सेल बँका आहेत, जिथे जन्माच्या वेळी गोळा केलेल्या स्टेम सेल्स (आपल्या आईला बाळाशी जोडणारी कॉर्ड) ही काही शुल्क भरल्यानंतर संग्रहित केली जाते. २०१७ पर्यंत चेन्नई येथील लाइफसेल बँक ही केवळ स्वतच्या कुटुंबासाठी स्टेम सेल वापरण्याची परवानगी देत असे. परंतु जगभरातील प्रचलित प्रथेमुळे त्यांनी इतर गरजू रूग्णांसाठी साठवलेल्या स्टेम सेलचा वापर करण्यास परवानगी दिली.
असा निवडला पर्याय
सुदैवाने लाईफ सेल बँकेत अशा दोन संग्रहित कॉर्ड स्टेम सेल्स होत्या सामान्यतः असे १ युनिट वापरले जाते , परंतु आम्हाला अशा २ युनिट्सची आवश्यकता होती कारण एका युनिटच्या स्टेम सेल्सचे प्रमाण “पुरेसे” नव्हते, म्हणून आम्ही दोन्ही स्टेम सेल्स वापरण्याचे ठरविले. दोन्ही कॉर्ड स्टेम सेल युनिट्स ९० % एकमेकांशी आणि रुग्णाशीही जुळत होती. परंतु या शिवाय अन्य पर्याय नसल्याने “डबल कॉर्ड स्टेम सेल” प्रत्यारोपणा चा पर्याय निवडण्यात आला.
ऑपरेशन च्या २२ दिवसानंतर संक्रमित स्टेम पेशी काम करू लागल्या आणि सर्व प्रकारच्या रक्त पेशी आता सामान्य संख्येने आहेत.
नाशकात खर्च कमी
“डबल कॉर्ड स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण हे पहिल्यांदाच होत असून स्टेम सेल चे जतन ही आवश्यक बाब आहे.असे प्रत्यारोपण नाशिक सारख्या तुलनेने लहान शहरात करण्यात आल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाले असल्याचे देखील या प्रत्यारोपण क्षेत्रात आहे. १२ वर्षाचा अनुभव असलेले डॉ. प्रितेश जुनागडे यांनी नमूद केले. नाशिक सारख्या टायर टू शहरात सर्व प्रगत तंत्रज्ञान तसेच तज्ञ उपलब्ध असून मोठ्या शहरांच्या तुलनेत येथे खर्च देखील कमी येतो .