नागपूर – देशातील रस्ते अपघातांचा प्रश्न अतिशय गंभीर असून याच्या मुळाशी बोगस वाहन परवाने हे महत्त्वाचे कारण आहे. देशातील तब्बल ३० टक्के वाहन परवाने बोगस आहेत, अशी माहिती चक्क देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच दिली आहे.
रस्ता सुरक्षे संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या नावाचा वाहन परवाना कसा काढला आणि परिवहन विभागातील कामकाज कसे चालते, हे सुद्धा गडकरींनी या कार्यक्रमात स्पष्ट केले. ही अपारदर्शकता घालविण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावले उचलत असल्याचा दावा गडकरींनी केला. तसेच, देशातील रस्ते अपघात रोखायचे असतील तर त्याचे नूळ शोधावे लागते. आपले अधिकारी आणि इंजिनिअर्स हे बोगस लायसन्स तसेच रस्त्यावरच्या मृत्यूंना जबाबदार असल्याचा आरोपही गडकरींनी केला आहे.
बघा, गडकरी काय म्हणाले
https://twitter.com/nitin_gadkari/status/1360854496939708418