सध्या १२ हजार बिबटे
भारतात आता 12,852 बिबटे असून 2014 मधे केलेल्या सर्वेक्षणात ही संख्या 7910 होती. बिबट्यांची 60 % पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 3,421, 1,783 आणि 1,690 बिबट्यांची संख्या अनुमानित आहे.
५ हजार प्रौढ बिबटे
भारतात वाघांसंदर्भात देखरेख ठेवताना परिसंस्थेतल्या वाघांची महत्वाची भूमिका स्पष्ट झाली, त्यातूनच बिबट्या सारख्या इतर करिश्माई प्रजातींवर प्रकाश पडल्याचे मंत्री म्हणाले. संरक्षित आणि बहु उपयोगी जंगलात हे वाघ आणि बिबट्या आढळतात. बिबट्यांच्या 51,337 छायाचित्रात एकूण 5,240 प्रौढ बिबटे आढळले आहेत.
ही संख्या किमान
बिबट्यांची वस्तीस्थाने असणाऱ्या देशातल्या जंगलातल्या वाघांची गणना झाली मात्र बिगर वन क्षेत्रातली (चहा आणि कॉफीचे मळे जिथे बिबट्याचा वावर मानला जातो) हिमालयावरची उंच स्थाने, ईशान्येकडचा भाग लक्षात घेण्यात आलेला नाही म्हणूनच बिबट्यांची ही संख्या किमान मानली जावी. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण- भारतीय वन्यजीव संस्था इतर विविध प्रजातीबाबत लवकरच अहवाल जारी करणार आहे.
https://twitter.com/PrakashJavdekar/status/1340987303720755207