मुंबई – जागतिक बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारांनी आजपर्यंतची सर्वोच्च उच्चांकी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजारानं आज ४४ हजार ५०० अंकांची पातळी गाठली तर राष्ट्रीय शेअर बाजारानं सर्वोच्च १३ हजार अंकांची पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४४६ अंकांची वाढ होऊन तो ४४ हजार ५२३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज १२९ अंकांनी वधारला आणि १३ हजार ५५ अंकांवर बंद झाला.