नवी दिल्ली – पोलिस दलाच्या ताफ्यात कुत्रे आणि घोडेही असतात. गुन्ह्यांची उकल करण्यात या दोघांची भूमिका अतिशय मोलाची असते. मात्र, देशभरात पोलिस दलामध्ये नक्की किती घोडे आणि श्वान आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत.
भारतात २३०० हून अधिक कुत्री आणि १४१५ घोडे पोलिसांची सेवा बजावत आहेत. यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. १ जानेवारी २०२० पर्यंत पोलिस संशोधन आणि विकास ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरात पोलिसांकडे सर्वाधिक घोडे आणि उंट आहेत. स्निफर डॉगच्या बाबतीत, ट्रॅकर कुत्र्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
ब्युरोच्या अहवालानुसार, देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३८६७ प्राणी आहेत ज्यात ‘ट्रॅकर्स कुत्री’, ‘स्निफर कुत्री’, घोडे आणि उंट यांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पोलिस संशोधन आणि विकास ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात १५१६ स्निफर आणि ८४९ ट्रॅकर्स डॉक आहेत. याव्यतिरिक्त, येथे १४१५ घोडे, २८ उंट आणि इतर ५९ प्राणी आहेत. गुजरात पोलिसांकडे सर्वाधिक ५७४, उत्तर प्रदेशातील ८२८, महाराष्ट्रात २८९ आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या सेवेत २४४ प्राणी आहेत. गुजरात पोलिसांकडे २२२ घोडे, स्नफर्स, ट्रॅकर्स कुत्री आहेत. गुजरातमध्ये २८ उंट व इतर सहा प्राणी आहेत.
दिल्ली पोलिसांच्या सेवेत ८६ जनावरे आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडे २१५ घोडे, स्निफर आणि ११७ ट्रॅकर कुत्री आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडे १९४ स्निफर आणि १०४ ट्रॅकर कुत्री आहेत, पण घोडा किंवा उंट नाही. मध्य प्रदेश पोलिसांकडे १३२ घोडे, ६८ स्निफर आणि ४४ ट्रॅकर कुत्री आहेत. तेलंगणा पोलिसांच्या सेवेत २३५ जनावरे आहेत, तामिळनाडूमध्ये २२६, कर्नाटकात २०८, पश्चिम बंगालमध्ये १९७७, राजस्थानात १८७, आंध्र प्रदेशात १८१, बिहारमध्ये १४७ आणि पंजाब पोलिसांच्या सेवेत १२७ प्राणी आहेत.